पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उस्मानाबाद: वाळू माफियांचा तहसीलदारावर जीवघेणा हल्ला

तहसीलदारावर जीवघेणा हल्ला

उस्मानाबादमध्ये वाळू माफियांनी तहसीलदारावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. परंडाचे तहसीलदार अनिल हेळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या तहसीदारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. 

दिल्लीमध्ये आज काँग्रेसची 'भारत बचाओ रॅली'; मोदी सरकारला घेरणार

मिळालेल्या माहितीनुसार, परांडा तालुक्यातील बंद पडलेल्या वाळू घाटावरून अवैधरित्या वाळूचा उपसा सुरु असल्याची माहिती तहसीलदार अनिल हेळकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अनिल हेळकर शनिवारी सकाळी ६ वाजता घटनास्थळी कारवाई करण्यासाठी दाखल झाले असता त्यांच्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अनिल हेळकर गंभीर जखमी झाले.

पालघर ४.८ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याने हादरले

घटनेची माहिती मिळताच उस्मानाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या तहसीलदारांना उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात दाखल केले. तहसीदारांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन तीन टॅक्टर जप्त केले आहेत.  या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी धडाडीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यावरच हल्ला झाल्याने महसूल प्रशासनात भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  

दिल्लीत लाकडाच्या वखारीला भीषण आग