पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संभाजी भिडेंना बेळगाव कोर्टाकडून जामीन मंजूर

संभाजी भिडे गुरुजी

शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांना जामीन मंजूर झाला आहे. बेळगाव कोर्टाने बुधवारी संभाजी भिडे यांना जामीन मंजूर केला. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीवेळी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात बेळगावातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी  बेळगाव कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. 

 

फडणवीस सरकारच्या काळात लावलेल्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश

कर्नाटक विधानसभा निवडणुकी दरम्यान बेळगावातील येळ्ळूर गावामध्ये कुस्तीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संभाजी भिडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना 'येळ्ळूरचे महाराष्ट्र मैदान हे देशातील अव्वल दर्जाचे कुस्तीचे मैदान आहे. या मैदानाला तोड नसून त्या माजी आमदाराला हे मैदान उद्धवस्त करायचे होते. त्याला त्याची जागा दाखवून द्या. येत्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करुन मराठी बाणा दाखवा', असे वक्तव्य संभाजी भिडेंनी केले होते.

अजितदादा आपण उगाच इतकी वर्षे वेगळे राहिलो, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य 

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन बेळगावातील ग्रामीण पोलिस ठाण्यात संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीच्या तारखेला उपस्थित न राहिल्यामुळे बेळगाव कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. 

अट्टल साखळीचोरांवर MPDA अन्वये कारवाई शक्य, मुंबई हायकोर्ट