पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संजय राऊतांना पदावरुन दूर करा; संभाजी भिडेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी

संभांजी भिडे

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत, असे वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शुक्रवारी सांगलीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.  शिवप्रतिष्ठानच्या वतीने संगली जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. 'संजय राऊत यांना पदावरुन दूर करा तसंच त्यांच्यावर कारवाई करा अशी उद्धव ठाकरे यांना हात जोडून विनंती करतो, असे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगितले आहे. 

निर्भया प्रकरण: दोषी मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

संभाजी भिडे यांनी पुढे असे सांगितले आहे की, 'सांगलीमध्ये पुकारण्यात आलेला बंद संजय राऊत यांच्याविरोधात आहे. हा बंद शिवसेना किंवा इतर राजकीय पक्षांविरोधात नाही', असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. समाजस्वास्थ्य बिघडेल अशी तुलना करु नये. बोलताना, वागताना तारतंम्य पाळावे. उदयनराजेंचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असे संभाजी भिडे यांनी सांगितले.

'भारतरत्न'पेक्षा महात्मा गांधी मोठे, सुप्रीम कोर्टाने पीआयएल फेटाळली

दरम्यान, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा, कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदर करतो. महाराजांचे नाव जिथे येते, तिथे आम्ही नतमस्तक होतो. पण शिवाजी महाराज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. स्वत:ला शिवराजायांचे वंशज म्हणणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना केले होते. त्यांच्या या वक्तव्याविरोधात गुरुवारी सातारा बंदची हाक देण्यात आली होती. तसंच, सातारा, मंगळवेढा आणि संगमनेरमध्ये  आंदोलन करण्यात आले होते.  

मुंबईत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रींची सुटका