पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मोदी सरकारनं केलेल्या कामाची पाहणी ट्रम्प कधी करणार?'

डोनाल्ड ट्रम्प हे फक्त ३६ तासांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प हे फक्त ३६ तासांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत.  मात्र ट्रम्प यांच्या ३६ तासांच्या दौऱ्यानं देशातील अनेक प्रश्न सुटणार नाहीत. ते आल्यानं इथल्या गरीब, मध्यमवर्गीय जनतेच्या आयुष्यात काडीमात्र फरक पडणार नाही, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या  'सामना'मधून करण्यात आली आहे. 

‘नमस्ते ट्रम्प’! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आजपासून भारतभेटीवर

''भेटीबद्दल देशभरात कमालीची उत्सुकता वगैरे शिगेला पोहोचल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ते काही तितकेसे खरे नाही. या ३६ तासांच्या दौऱ्यात ट्रम्प पती-पत्नी दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमांची पाहणी करतील. मग मोदी सरकारने केलेल्या कामांची पाहणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कधी करणार?'', असा सवाल शिवसेनेने केला आहे.

थुंकी लावून पानं पलटू नका, कर्मचाऱ्यांना आदेश

''ट्रम्प हे अमेरिकेसारख्या स्वतःस महासत्ता वगैरे समजणाऱ्या व त्याबरहुकूम जगात फौजदारी करणाऱ्या एका देशाचे अध्यक्ष आहेत. ट्रम्प येतील व जातील. ३६ तासांनंतर त्यांच्या येण्या-जाण्याच्या खुणाही देशाच्या मातीत राहणार नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आल्याने येथील गोरगरीब, मध्यमवर्गीय जनतेच्या जीवनात कानामात्रेचा फरक पडणार नाही. मग ट्रम्प यांच्या येण्याचे येथील जनतेला कौतुक किंवा उत्सुकता असण्याचा प्रश्न येतोच कुठे? ट्रम्प आधी अहमदाबादला उतरतील. तिथे तीनेक तास घालवतील व मग दिल्लीत अवतरतील. ट्रम्प यांच्या आगमनाविषयी कुठे उत्सुकता असलीच तर ती अहमदाबादेत असायला हरकत नाही.'' अशी मार्मिक टीका शिवसेनेनं केली आहे. 'ट्रम्प यांच्या आगमनाप्रीत्यर्थ अहमदाबादचे रस्ते चकाचक झाले व झोपड्या वगैरे दिसू नयेत म्हणून रस्त्याच्या कडेस भिंती उभारल्या गेल्या. ट्रम्प यांच्या आगमनापेक्षा या लपवाछपवीचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे', असंही सामनामध्ये म्हटलं आहे. 

अशी असेल ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची रुपरेषा

'भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या संकोचावर ट्रम्प बोलतील असे माध्यमातील वृत्तांमधून म्हटले आहे. मात्र ट्रम्प यांनी सुधारित नागरिकत्व कायदा राष्ट्रीय नागरिक नोंदवही  आणि शाहीन बाग या मुद्द्यांवर न बोललेलंच बर. कारण हे आमचे अंतर्गत मुद्दे आहेत. यातून इथलेच राज्यकर्ते मार्ग काढतील, अशीही भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.