पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साई जन्मस्थान वाद मिटला? पाथरीचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास होणार

साईबाबा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिर्डी ग्रामस्थांच्या चर्चेनंतर साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वाद अखेर मिटला आहे. पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. त्यांच्या आश्वासनानंतर शिर्डीकर समाधानी आहेत. आता नवा कोणताही वाद निर्माण होणार नाही, असंही आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं असल्याचं शिर्डी संस्थानचे कमलाकर कोठे यांनी म्हटलं आहे.

CM उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर बेमुदत शिर्डी बंद मागे  

पाथरी साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी याठिकाणी विकास योजना जाहीर केल्यामुळे साईबाबांचे जन्मस्थान शिर्डी की पाथरी हा मुद्द्याला तोंड फुटले होते. पाथरी नव्हे तर शिर्डी हेच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचे सांगत शिर्डीकरांनी बेमुदत शिर्डी बंद पुकारला होता. मुख्यमंत्र्यांनी चर्चेतून मार्ग काढू असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी शिर्डी बंद रविवारी मागे घेतला होता.  

शिर्डी वादासंदर्भात CM ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर विखे-पाटील म्हणाले...

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप-मुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर खास बैठक पार पडली. या बैठकीला ४० जणांच्या शिष्टमंडळासह भाजप नेते आणि आमदार बाळासाहेब विखे-पाटील यांच्यासह खासदार सदाशिव लोखंडे उपस्थितीत होते. या दोन्ही नेत्यांनी बैठकीत समाधानकारक निर्णय झाल्याची प्रतिक्रिया दिली होती. मुख्यमंत्र्यांनी अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Sai Baba Birthplace Controversy shirdi villagers satisfied with cm uddhav thackerays assurance