पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भगव्या रंगावर कोणाची मक्तेदारी नाहीः सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे

भगव्या रंगावर कोणाची मक्तेदार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज आहे. त्यामुळे आम्ही भगवा झेंडा वापरला तर गैर काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्या सोलापूर येथे बोलत होत्या. शिवस्वराज्य यात्रेवर निघालेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस दोन झेंडे झळकवणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली होती. एक घड्याळाचे चिन्ह असलेला राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा, तर दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेला भगवा ध्वज, असे दोन्ही झेंडे आता पक्ष कार्यकर्त्यांच्या हाती असतील, असे पवार म्हणाले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात यावर मोठी चर्चा रंगली होती. भाजप-सेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्यावर सुप्रिया सुळे यांनी भगवा झेंडा वापरण्यात काहीही गैर नसल्याचे म्हटले.

विधानसभेसाठी सुप्रिया सुळेंची राज्यभर 'संवाद यात्रा'

यावेळी त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांविषयी भाष्य केले. त्या म्हणाल्या, पक्ष सोडून जाताना नेत्यांनी पक्षावर आणि शरद पवारांवर टीका केली नाही. पक्ष सोडून गेलेल्यांचा पराभव झाला. मागील १० वर्षांपासून राज्यात वेगळी संस्कृती येत आहे. राज्याची चिंता कोणाला नाही. राज्यातील संस्था सरकारने अडचणीत आणल्या. 

पथ घेतल्यानंतर कोल्हे म्हणाले जय शिवराय, जय महाराष्ट्र!

ईडी व सीबीआय ही स्वायत्त संस्था असताना त्यांचा वापर करून, बँका व कारखानदारांवर दबाव आणला जातोय, असा आरोप सुळे यांनी केला. तसेच शिखर बँक प्रकरणी ५२ जणांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यात सर्व पक्षांचे नेते आहेत. पण त्याऐवजी एकाच नावावर लक्ष्य केले जात आहे. कसेही करा राष्ट्रवादी चर्चेत राहतो. म्हणजे नाणे आमचेच चालते, असे त्या म्हणाल्या.