पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सचिनच्या सुरक्षेत कपात, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

सचिनच्या सुरक्षेत कपात

'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर याला पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. तर शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आदित्य यांना आधी 'Y+' सुरक्षा होती आता त्यांची सुरक्षा वाढवून त्यांना ‘Z’ सुरक्षाकक्षा पुरवण्यात आली आहे.   

सिंचन घोटाळा : अजित पवारांच्या क्लीन चीटवर शंकेचे नवे ढग

 सचिन तेंडुलकर आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर राज्यातील अतिमहत्त्वाच्या ९० नागरिकांच्या सुरक्षेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेविषयी महाराष्ट्र सरकारच्या समितीनं आढावा घेऊन मगच हे बदल केले आहेत. भारतरत्न सचिनला 'X' प्रकारची सुरक्षा आतापर्यंत पुरवण्यात आली होती. या प्रकारात  सचिनभोवती सदैव पोलिस सुरक्षारक्षकांचं कडं  होतं, मात्र आता सचिन जेव्हा घराबाहेर पडेल तेव्हाच त्याच्याभोवची पोलिसांचं सुरक्षकवच असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि आमदार आदित्य ठाकरे यांना ‘Z’ प्रकाराची सुरक्षा पुरवण्यात आली आहे, याचा अर्थ  त्यांच्याभोवती असणारं संरक्षक कवच अधिक मजबूत करण्यात आलं आहे.

अडीच वर्षांपूर्वीच मी नवऱ्याचा खून केला, मला फाशी द्या; पत्नीचे पत्र

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्यांना ‘Z+’  सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. तर अजित पवार यांना पुन्हा एकदा ‘Z’  प्रकाराची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना आधी 'Y+' सुरक्षा देण्यात आली होती आता त्यांची सुरक्षा अधिक मजबुत करण्यात आली असून त्यांना ‘Z’  प्रकाराची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. 

सरकारी वकील उज्वल निकम यांच्या सुरक्षेत मात्र कपात करण्यात आली आहे. त्यांना यापूर्वी  ‘Z+’ सुरक्षा पुरवण्यात आली होती मात्र नव्या आलेखानुसार त्यांची सुरक्षा कपात करुन त्यांना 'Y' प्रकारची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.