पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आंगणेवाडीच्या जत्रेसाठी भाविकांसाठी विशेष एक्स्प्रेस

प्रातिनिधिक छायाचित्र

कोकणातल्या प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेसाठी पश्चिम रेल्वेकडून दोन विशेष एक्स्प्रेस धावणार आहेत. वांद्रे टर्मिनस ते  थिविम अशी ही विशेष एक्स्प्रेस सेवा सुरु करण्यात आली आहे. या एक्स्प्रेसच्या तिकिट बुकिंगची सुरुवात आजपासून झाली आहे. १७ फेब्रुवारीला आंगणेवाडीची जत्रा आहे. या जत्रेसाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून भाविक येतात. 

सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट आणि मुलीचा अपघाती मृत्यू

जत्रेच्या आधी शनिवार, रविवार येत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या वतीनं दोन विशेष एक्स्प्रेस धावणार आहेत. वांद्रे टर्मिनस ते थिविम (०९०९१) ही ट्रेन १५ फेब्रुवारी २०२० ला रात्री ११. ४५ वाजता वांद्रे टर्मिनस स्थानकातून सुटेल ती दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता थिविम स्थानकात पोहोचेल. 

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर पंकजा मुंडेंचं आज उपोषण

त्यानंतर १६ फेब्रुवारी रविवारी थिविम  स्थानकातून दुपारी १. ५० मिनिटांनी दुसरी ट्रेन सुटेल जी पहाटे ४ वाजता वांद्रे टर्मिनस स्थानकात पोहचेल. ही विशेष एक्स्प्रेस बोरिवली, वसई, पनवले, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी स्थानकात थांबेल.