पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तरूण भारत'मधून पुन्हा एकदा संजय राऊतांवर टीकास्त्र, धृतराष्ट्र म्हणून उल्लेख

खासदार संजय राऊत

शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तास्थापन करण्यासाठी कोणतीही चर्चा सुरू नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असतानाच 'सामना' आणि 'तरूण भारत' या दोन्ही वृत्तपत्रांतील एकमेकांविरोधातील टीकेमुळे युतीतील दुरावा आणखी वाढण्याची स्थिती आहे. एकीकडे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात असताना दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित तरूण भारतमधून शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला जातो आहे. तरूण भारतने सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी आपल्या अग्रलेखामधून संजय राऊत यांच्यावर टीका केली.

फडणवीस यांच्यावरून ट्विटरवर रंगले हॅशटॅग युद्ध!

नागपूर तरूण भारतच्या मंगळवारच्या अंकामध्ये लिहिण्यात आलेल्या अग्रलेखात म्हटले आहे की, तरूण भारत माहिती नाही, असे सांगून एकप्रकारे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे महाराष्ट्रासमोर प्रदर्शन करणाऱ्या स्वयंघोषित अनुभवी पत्रकाराचे अभिनंदनच करावे लागेल. तरूण भारत काय आहे आणि काय नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे धृतराष्ट्राकडून प्रमाणपत्राची तर आम्ही मुळीच अपेक्षा करीत नाही.

'मावळते मुख्यमंत्री' म्हणत शिवसेनेने फडणवीसांना डिवचले

एका अग्रलेखावरून एखादा माणूस इतका अस्वस्थ होईल की महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांची नावंही विस्मरणात जातील, असे आम्हाला कधी वाटले नव्हते, असेही या अग्रलेखात म्हटले आहे. राज्यात भाजपवगळता कोणत्याच समीकरणाची जुळवाजुळव होऊ शकत नाही, हे जर एखाद्या शेंबड्या पोराला समजत असेल, तर ते यांना का कळू नये, असाही प्रश्न अग्रलेखात विचारण्यात आला आहे.