पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता 'RSS आणि राष्ट्र उभारणी' विषय

नागपूर विद्यापीठ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्र उभारणीतील योगदान' हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूरमध्येच आहे. तेथील विद्यापीठाने या पद्धतीने दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. 

कला शाखेच्या दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये तिसऱ्या भागात हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचवेळी अभ्यासक्रमाच्या पहिल्या भागात काँग्रेसची स्थापना आणि माजी पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरू यांचा भारताच्या राजकीय व्यासपीठावरील उदय हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. दुसऱ्या भागामध्ये सविनय कायदेभंग चळवळीचा विषय अभ्यासक्रमात सामावून घेण्यात आला आहे.

#INDvNZ कुठं नेऊन ठेवलंय शमीला आमच्या, नेटकरी संतापले

इतिहासातील सर्व नवे प्रवाह विद्यार्थ्यांना समजावेत, यासाठी हा बदल करण्यात आला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या आधी २००३-०४ मध्ये कला शाखेच्या पदव्युत्तर पदवी (एमए) इतिहासाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख हा विषय समाविष्ट करण्यात आला होता. 

विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य सतीश चाफळे म्हणाले, यंदाच्या वर्षीपासून आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र उभारणी हा विषय कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. विद्यार्थ्यांना इतिहासातील नवे प्रवाह कळावेत, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. अभ्यासक्रमामध्ये मार्क्सवाद, नवं मार्क्सवाद हे विषयही समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कर्नाटकात सरकारला हलका दिलासा, ८ बंडखोरांचे राजीनामे चुकीचे लिहिलेले

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. त्यांनी ट्विटच्या द्वारे आपले म्हणणे मांडले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र उभारणी याचे संदर्भ नागपूर विद्यापीठाला मिळाले कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्यासाठी शिक्षण विभागाचा वापर केला जातो आहे. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण दिले जात नाही, असाही आरोप त्यांनी केला.