पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात, मोदी है तो मुमकीन है!

मोहन भागवत

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कौतुक केले. आपल्या भावना व्यक्त करताना मोहन भागवत यांनी मोदी है तो मुमकीन है आशयाचे वक्तव्य केले आहे. मोहन भागवत यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त संघ मुख्यालयात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी कलम ३७० चा मुद्दा उपस्थित केला.

भारत दहशतवाद्यांचे खरे चेहरे जगासमोर आणणार - मोदी

ते म्हणाले, संपूर्ण समाजाने दृढ संकल्प दाखविल्यानेच जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे शक्य झाले. जर सर्वांनी मिळून ठरविले तर एखादी अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होऊ शकते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपले प्राण दिले, त्यांचे स्मरण करण्याचा आणि नव्याने संकल्प सोडण्याचा आजचा दिवस आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्याला दुष्काळमुक्त करणार; स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांचा निर्धार

कलम ३७० रद्द करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी जी इच्छाशक्ती दाखविली आहे. त्याचेही मोहन भागवत यांनी कौतुक केले. ते म्हणाले, लोक सध्याच्या पंतप्रधानांबद्दल असे म्हणतात की ते आहेत तर सर्व काही शक्य आहे. असे म्हणणे ठीक आहे. त्यात काही चुकीचेही नाही. सर्वकाही माणसाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते.
कलम ३७० रद्द करण्याचा आणि जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात येणार आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:rss chief mohan bhagwat praises pm modi for article 370 move says modi hain toh mumkin hain