पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतकऱ्यांच्या भावना दूखावण्याचा माझा हेतू नव्हता: रोहित पवार

रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये जंगी मिरवणुक काढण्यात आली होती. रोहित पवार विधानसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच मतदार संघामध्ये आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची मिरवणूक काढत ३० जेसीबीच्या सहाय्याने गुलाल उधळून जोरदार स्वागत केले. या मिरवणुकीवरून रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. या टिकेनंतर रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

सत्ता स्थापण्यासाठी भाजप-शिवसेना एकत्र येतीलः शरद पवार

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'सर्वांनी मिळून मोठ्या आनंदात मिरवणूक काढली. त्यांच्या आनंदात मी सहभागी झालो. पण यामध्ये कुठेही शेतकऱ्यांच्या भावना दूखावण्याचा हेतू नव्हता. मी बांधिलकी जपतो ती या मातीशी अन लोकांशी. आपल्या आनंदामुळे एकाही व्यक्तीचा अपमान व्हावा, त्यांना वाईट वाटावं असा माझा कधीच हेतू नव्हता व भविष्यात देखील नसेल.', असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

'इस्रोकडून लवकरच चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी पुन्हा प्रयत्न'

परतीच्या पावसामुळे शेतकरी हैरणा झाले आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दौरे करत आहे. तर दुसरीकडे रोहित पवार विजयाचा गुलाल उधळत असल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. या टीकेनंतर रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहीत 'आपल्या आनंदामुळे अगदी एका व्यक्तीला जरी वाईट वाटलं तर आपण त्या एका व्यक्तीचा विचार करायला हवा हेच मी लहानपणापासून शिकलो', असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

भाजपपेक्षा शिवसेना बरी, सेनेला पाठिंबा देण्यासाठी दलवाईंचे पत्र