पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इगतपूरीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ता गेला वाहून

इगतपुरीत रस्ता गेला वाहून

गेल्या चार ते पाच दिवसांपासून सलग पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका इगतपुरी तालुक्याला बसला आहे. इगतपुरी येथे मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आला असून त्यामध्ये रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. तसंच या पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान देखील झाले आहे. 

काँग्रेस तोंडघशी, काही आमदार कलम ३७० रद्द करण्याचा बाजूने

आज सकाळी इगतपुरी तालुक्यातील निनावी आणि भरवीर बुद्रुक या गावाजवळ असणारा रस्ता ओढ्याला पूर आल्यामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. टाकेद, अडसरे, भरविर बुद्रुक, भांडरवडी या गावांचा संपर्क तुटला आहे. या गावातील विद्यार्थी, नोकरदार आणि शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहे. कारण यांना नाशिक भगूर येथे जाण्यासाठी यांना 20 किलोमीटर अंतरावरुन प्रवास करावा लागत आहे. 

... हा तर सत्तेचा गैरवापर, राहुल गांधींची कलम ३७० वरून सरकारवर टीका

मुसळधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूराचे पाणी शेतात शिरल्यामुळे भात शेती वाहून गेली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये काकडी, टोमॅटो, फ्लॉवर आणि झेंडूची लागवड केली होती. मात्र पावसामुळे शेतात पाणी साचल्यामुळे त्याचे सुध्दा मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. 

काश्मीरसाठी आमची प्राण देण्याची तयारी - अमित शहा