पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन येणाऱ्यांवर काळाचा घाला, ४ ठार, ६ जण जखमी

अपघात (प्रतिकात्मक छायाचित्र)

सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर रविवारी रात्री काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने चिरडल्याने नादुरुस्त टेम्पोसमोर उभे असलेले ४ जण ठार तर ६ जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास वणीजवळ घडली. सर्व जखमी आणि मृत हे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. 

मुंबईत रस्ते अपघात सर्वाधिक, पण मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण घटले

'एबीपी माझा'ने दिलेल्या वृत्तानुसार, नाशिक जिल्ह्यातील काही जण आयशर टेम्पोत वणी येथील सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेण्यास गेले होते. दर्शन घेऊन परतताना रात्री साडेबाराच्या सुमारास वणीच्या पुढे त्यांची टेम्पो नादुरुस्त झाली. दुरुस्तीचे काम सुरु असताना टेम्पोतील काही लोक हे खाली उतरले आणि रस्त्यावर थांबले. त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. यात ४ जण ठार झाले तर ६ जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुण्यात १३ प्रमुख ठिकाणी मोठे बदल