पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माळीणप्रमाणे तिवरे धरण बाधितांचे पुनर्वसन करा, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शरद पवार

तिवरे धरण फुटल्यामुळे बाधित झालेल्या कुटुंबांचे माळीण गावाप्रमाणे पुनर्वसन करावे. धरण फुटल्यामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शरद पवार यांनी ही मागणी केली. दोनच दिवसांपूर्वी शरद पवार यांनी तिवरे धरण फुटल्याच्या ठिकाणी जाऊन तेथील पाहणी केली. त्याचबरोबर त्यांनी आजूबाजूच्या गावातील लोकांशी यावेळी संवाद साधला.

कर्नाटकनंतर गोव्यात राजकीय भूकंप, १० आमदारांचा काँग्रेसला 'रामराम'

तिवरे धरण फुटल्यामुळे बाधित झालेल्यांना प्राथमिक सुविधा तातडीने पुरविल्या जाव्यात. त्यांच्यासाठी पाण्याची सोय, विजेची सोय केली जावी, असेही शरद पवार यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर धरणाच्या पाण्यामुळे ज्यांची घरे वाहून गेली. ज्यांच्या शेतीचे नुकसान झाले, त्यानाही याचा मोबदला दिला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

९ जुलैला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दोन पानी पत्र पाठविले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, तिवरे धरण फुटल्यामुळे बाधित झालेल्या कुटुबांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन केले पाहिजे. पुण्यातील माळीण गावातील लोकांचे ज्या पद्धतीने पुनर्वसन करण्यात आले. त्याच पद्धतीने येथील लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. माळीण दुर्घटनेनंतर तत्कालिन सरकारने ग्रामस्थांसाठी आवश्यक असलेली सर्व मदत तातडीने दिली होती. मुख्यमंत्री सहायता निधी, पंतप्रधान सहायता निधी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन सहायता निधी या सर्व माध्यमातून ग्रामस्थांना मदत मिळवून देण्यात आली होती. त्याच पद्धतीने तिवरे धरण बाधितांना मदत मिळवून दिली पाहिजे.

अभियंत्यावर चिखल फेक प्रकरणात नितेश राणेंना जामीन मंजूर

तिवरे धरण नेमके कशामुळे फुटले याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.