पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अवघ्या २० दिवसांत रविकांत तुपकर पुन्हा 'स्वाभिमानी'त

रविकांत तुपकर

रविकांत तुपकर यांनी अवघ्या २० दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदासह संघटनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला होता. परंतु, आज (बुधवार) ते पुन्हा स्वगृही परतले आहेत. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. यावेळी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी तुपकर यांच्या छातीवर संघटनेचा बिल्ला लावून संघटनेत प्रवेश केला. 

..ही तर पाठीत वार करणारी औलाद, उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल

राज्यात महायुतीची सत्ता आल्यावर तुपकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष पद सोपवण्यात आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी महायुतीविरोधात भूमिका घेतल्यानंतर तुपकर यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता.

पृथ्वीराजबाबांना त्यांच्या घरचीही मतं मिळणार नाहीतः उदयनराजे

तुपकर हे राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक मानले जातात. सदाभाऊ खोत संघटनेतून बाहेर पडल्यानंतर तुपकर हेच दोन नंबरचे नेते आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना संघटनेची साथ सोडल्याने राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला होता.

'मोदींच्या सभेसाठी वृक्षतोड, या गोष्टीचा बाऊ करण्याची गरज काय?'