पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्योगपती रतन टाटा RSS च्या तृतीय वर्गाचे प्रमुख पाहुणे

रतन टाटा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या १७ जून रोजी होणाऱ्या समारोपाला यावेळी उद्योगपती रतन टाटा उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे. संघाने त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिले आहे. मात्र, टाटांनी ते स्वीकारल्याचे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. भाजपध्यक्ष अमित शहा व मुरलीमनोहर जोशी हे सुद्धा वर्गाला भेट देण्याची शक्यता आहे. 

RSS नेही मोदींना मदत करणं बंद केलंय, मायावतींचा आरोप

गेल्याच महिन्यात रतन टाटा नागपूरच्या संघ मुख्यालयात येऊन गेले आहेत. मागील वर्षी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमास हजेरी लावली होती. यावरुन जोरदार राजकीय वादंग निर्माण झाले होते. रेशीमबागेतील स्मृतीभवन परिसरात २२ मे पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय संघ शिक्षा वर्ग सुरु आहे. या वर्गाचा समारोप १७ जून रोजी होईल. या वर्गाला देशभरातून विविध प्रांतातील ८२८ स्वयंसेवक या वर्गात सहभागी झाले आहेत. 

'...तेव्हा RSS वाले ब्रिटीशांची चमचेगिरी करत होते'