पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आठवलेंनी या घोषणेबद्दल CM उद्धव ठाकरेंचे मानले आभार

रामदास आठवले आणि उद्धव ठाकरे

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेबद्दल आभार मानले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतील ज्या बीआयटी चाळीत दोन दशकाहून अधिककाळ राहिले त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी महापरिनिर्वाण दिनी केली होती. या घोषणेनंतर रामदास आठवलेंनी पीटीआयला प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले. 

सशस्त्र सेना ध्वज दिनी PM मोदींच्या हस्ते निधीसंकलनाचा शुभारंभ

परेल स्थित बीआयटी चाळीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बराच काळ वास्तव्यास होते. १९१२ ते १९३४ पर्यंत २२ वर्षे ते याठिकाणी राहायला होते. ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी येऊन अभिवादन केले होते. अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या बाबासाहेबांचे याठिकाणी स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. हे स्मारक अन्याय आणि भेदभावाच्या लढाईत आपल्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. 

..तर मला वेगळा विचार करावा लागेल, नाराज खडसेंचा पक्षश्रेष्ठींना इशारा

राज्यातील संत्तासंघर्षाच्या घडामोडीदरम्यान रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन करणे हे आत्मघातकी पाऊल असल्याचे ते म्हटले होते. एवढेच नाही तर शेवटपर्यंत भाजप- शिवसेना यांनी एकत्रित येत सत्तास्थापन करावी, असे ते म्हणत होते. दोन्ही पक्षांना एकत्रित आणण्यासाठी मध्यस्थीची भूमिका करण्याबाबतही त्यांनी बोलून दाखवले होते. मात्र त्यांना अपेक्षित असे काहीच घडले नाही.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ramdas Athawale congratulated Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray For declaring B R Ambedkars old house converted into a national memorial