पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता आणखी एक राजकीय भूकंप होणार, रामदास आठवलेंचा इशारा

रामदास आठवले

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय शेरेबाजीला सुरुवात झाली आहे. राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही मोठ्याप्रमाणात करण्यात आले. त्यात आता रिपाइंचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे. महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यांत राजकीय भूकंप होणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. आधी देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांनी भूकंप केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तर आता आणखी एक नवीन भूकंप येणार असल्याचे म्हटले आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याची तयारी सुरु

'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, आठवले म्हणाले की, महाराष्ट्रात दोन महिन्यांत भूकंप होणार आहे. एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा झाला. आता कसा भूकंप होतो, ते आम्ही पाहू. पण कोणता ना कोणता भूकंप होण्याची शक्यता आहे.

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीही पेटले

दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेनेने लोकसभेत समर्थन करण्यावरुन आणि सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेस-शिवसेना समोरासमोर आले आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेत संघर्षाचे वातावरण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे. तत्पूर्वी शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही भाजप-शिवसेना पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात, असे म्हटले होते.

चहापानाच्या बहिष्कारावर CM ठाकरेंनी विरोधकांना दिला PM मोदींचा दाखला