पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यसभा निवडणूक : भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी

संसद भवन

महाराष्ट्रातील भाजपच्या वाट्याला येणाऱ्या राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून गुरुवारी त्याने नाव जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होणार आहे. विधानसभेतील पक्षीय बलानुसार भाजपच्या वाट्याला ३ जागा येत आहेत. 

काळजी नको, कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय

भाजपकडून बुधवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि साताऱ्याचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तिसऱ्या जागेसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार, याबद्दल उत्सुकता होती. तिसऱ्या जागेसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव चर्चेत होते. केंद्रीय नेतृत्त्वाला आम्ही एकनाथ खडसे यांचे नाव सुचविले आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सांगितले होते. पण गुरुवारी अचानकपणे तिसऱ्या जागेसाठी डॉ. भागवत कराड यांचे नाव जाहीर करण्यात आले.

... या कारणांमुळे ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस सोडली

डॉ. भागवत कराड हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी विधानभवनामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.