पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी-शहांसह उद्धव ठाकरेंचंही चांगलं व्यंगचित्र काढता येईल: राज ठाकरे

राज ठाकरे

व्यंगचित्र सुचणे पण ती रेखाटता न येणे हा मोठा पराभव असतो, अशी शिकवण दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळाली, असे महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्षक राज ठाकरे यांनी 'मटा फेस्टिवल'च्या कार्यक्रमातील मुलाखतीमध्ये सांगितले. यावेळी त्यांना सध्याच्या घडीला राजकीय व्यक्तिमत्वे व्यंगचित्रासाठी कोणते व्यक्तिमत्व योग्य वाटते, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्याचे पाहायला मिळाले. 

दिल्ली हिंसाचाराला भाजपच जबाबदार, शरद पवारांचा केंद्र सरकारवर घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चहरे हे व्यंगचित्र काढण्याजोगे आहेत. मात्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्यात व्यंगचित्र काढण्याची गंमत नाही, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांचा चेहरा व्यंगचित्रासाठी योग्य नसल्याचे सांगताना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यात व्यंगचित्राची बात होती. एवढेच नाही तर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या चेहराही व्यंगचित्रासाठी योग्य असल्याचे ते म्हणाले.  

ममता दीदींनी राज्यात दंगल घडवून आणली : अमित शहा

महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चहरे देखील व्यंगचित्रासाठी साजेसे असल्याचे त्यांनी सांगितले. पवारांचे व्यंगचित्र काढायचे असेल तर ते पूर्णच बरे काढल्यास शोभून दिसेल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:raj thackeray talk about cartoon political personality he says narendra modi amit Shah and uddhav thackeray face is good Rahul Gandhi Not perfect