पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबाद एन्काऊंटरवर राज ठाकरे म्हणाले की,...

राज ठाकरे

हैदराबादमध्ये महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या करणाऱ्या चार नराधमांचे पोलिसांनी शुक्रवारी सकाळी एन्काऊंटर केलं. तेलंगणा पोलिसांच्या या कामगिरीनंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

हैदराबाद एन्काऊंटर प्रकरण: पोलिसांच्या कामगिरीचे होतेय कौतुक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पोलिसांच्या कामगिरीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कधी कधी 'ठोकशाही'ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो, असे ट्विट करत राज ठाकरे यांनी आपल्या मनातील भवना व्यक्त केली. एका वाक्यातील शब्दांतून आरोपीला योग्य शासन झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

बंदूक हिसकावून आरोपीने पहिली गोळी झाडली : पोलीस आयुक्त  

बलात्कारातील आरोपींचा खात्मा केललेल्या पोलिसांवर पुष्पवृष्टी करत तेलंगणातील जनतेने त्यांचे आभार मानल्याचे पाहायला मिळाले होते. सोशल मीडियावर यासंदर्भात चांगलीच चर्चा सुरु असून तेलंगणा पोलिसांची कामगिरी सॅल्यूट करण्याजोगी असल्याच्या प्रतिक्रिया उटत आहेत. पीडितेला न्याय मिवळून दिला असल्याचे मत या महिलांकडून व्यक्त केले जात आहे.