पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसे महाअधिवेशन : 'इंजिना'ला नवी दिशा मिळणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज, गुरुवारी गोरेगाव येथे राज्यव्यापी महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता नेस्को सेंटर येथे अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाची भूमिका जाहीर करणार असल्याचे बोलले जाते. तर पक्षाच्या नव्या झेंड्याचंही अनावरण होणार आहे.  

मनसे आता भगव्याची साथ धरेल असे तर्क राजकिय विश्लेषक वर्तवत आहेत. महाअधिवेशनाच्या अनेक पोस्टरमध्ये भगव्याची झलक पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिवशी  हे महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. पक्ष स्थापनेपासून पहिल्यांदाच  पक्षाचा कल हिंदुत्त्वादाच्या दिशेनं जाताना दिसत आहे. या अधिवेशनाच्या आधी मनसेच्या अनेक बड्या नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे  सच्च्या शिवसैनिकांना 'मन से' सामिल व्हा असं आवाहनही केलं आहे. 

पाक रेंजर्सच्या मदतीने दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात

सकाळी नऊ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाला राज्यातील हजारो मनसे कार्यकर्ते उपस्थित राहतील. या अधिवेशनातून पक्षाला नवसंजीवनी मिळणार का? राज ठाकरे काय भूमिका मांडतील याकडे आता महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागून आहे. 

Video : अनुपम खेर यांचा नसीरुद्दीन शहा यांच्यावर पलटवार