पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज ठाकरे हे प्रसिद्धीसाठी स्टंट करणारे नेतेः प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे

काँग्रेसला आम्ही ४० जागांचा प्रस्ताव दिला आहे. आमच्या २८८ जागा जाहीर करेपर्यंत तो प्रस्ताव कायम आहे. काँग्रेससोबत जायचे की नाही याबाबत दोन दिवसांत सांगू, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. राज ठाकरे हे प्रसिद्धीसाठी स्टंट करणारे नेते आहेत. ईव्हीएमच्या विरोधातील त्यांचे आंदोलन हे एक स्टंटच आहे, असा टोलादेखील त्यांनी लगावला. औरंगाबाद येथे बंजारा समाजाच्या मेळाव्यासाठी आल्यानंतर त्यांनी वंचित आघाडीची भूमिका स्पष्ट केली.

निवडणुकांसाठी आम्हाला यात्रा काढायची गरज नाही, प्रकाश आंबेडकरांचा टोला

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांमुळे लोक पक्ष सोडत असल्याचे सांगत लोकसभेत वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढल्याचे ते म्हणाले. काँग्रेस आणि त्यांच्या पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आणि त्याचा पाढा भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाचत आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत आम्हाला बी टीम म्हणणारी काँग्रेस विधानसभेत आम्हाला सोबत या म्हणते, हे नेमके काय, याचा खुलासा आधी त्यांनी करावा, असे ते म्हणाले. या वेळी मनसेचे जिल्ह्यातील एकमेव बिडकीन जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण यांनी 'वंचित'मध्ये प्रवेश केला. 

आमच्याकडील भाकड गायी भाजप-सेनेत गेल्याने दुःख नाही : जयंत पाटील

लोकसभा निवडणूक वंचित विरुद्ध भाजप होईल असे वाटले होते, मात्र ईव्हीएममुळे ते शक्य झाले नाही. परंतु आता आगामी विधानसभा निवडणूक ही वंचित विरुद्ध भाजप अशीच राहणार आहे. हे येणाऱ्या काळात सर्वांना दिसून येईल, असेही ते म्हणाले.