पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : आतापर्यंत राज्यात १ लाख २९ हजार ४४८ प्रवाशांची तपासणी

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरताना दिसत आहे.

पुण्यातील दुबईहून परतलेल्या एकाच कुटुंबियातील तिघांसह त्यांच्या सहवासातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर कोरोना बाधितांच्या सहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु आहे. पुण्यातील दाम्पत्यानंतर त्यांच्यासोबत दुबईहून परतलेल्या मुलगीसह ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई-पुणे प्रवास केला तो टॅक्सीचालक आणि त्यांच्या विमानातील सहप्रवासी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पुण्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून राज्यात ३०९ पैकी २८९ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत, अशी माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

कोरोना : CM उद्धव ठाकरेंनी बुधवारी बोलावली बैठक, IPL वरही चर्चा होणार

१० मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत १ हजार १०१ विमानांमधील १ लाख २९ हजार ४४८ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या करोनाचा उद्रेक मोठया प्रमाणावर सुरु असल्याने २१ फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.  आतापर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण ५९१ प्रवासी आले आहेत. 

पुणेरी कुटुंबातील तिघांसह त्यांच्या संपर्कातील दोघांना कोरोनाची लागण

१८ जानेवारी पासून आतापर्यंत ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३०४ जणांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यापैकी २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने तपासणी निगेटिव्ह आली असून ५ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३०४ प्रवाशांपैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सद्याच्या घडीला पुण्यातील रुग्णालयात १२ जण तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात ३ जण डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत, अशी माहितीही आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.  

कोरोनाच्या जलद निदानासाठी NIV कडून स्पेशल मेडिकल किट्सची मागणी

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२  बेडस उपलब्ध आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येत असून लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. मोठया प्रमाणावर करोना बाधित असणाऱ्या १२ देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Punes Corona infections After Five positive tests confirmed maharashtra State health minister given review report till date