पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प; मंकी हिल दरम्यान दरड कोसळली

मंकि हिलजवळ रेल्वेमार्गावर दरड कोसळली

पुणे- मुंबई रेल्वे वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर मोठी दरड कोसळली आहे. त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे येणारी आणि मुंबईकडून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान दरड कोसळल्याची घटना घडली आहे. पुढील दोन दिवस तरी वाहतूक सुरु होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.  

मेहबूबा मुफ्ती, अब्दुल्लांसह अनेक नेते नजरकैदेत; कलम १४४ 

गेल्या काही दिवसांपासून पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याच्या घटना समोर येत आहे. आज सकाळी मुसळधार पावसामुळे मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान रेल्वे मार्गावर मोठी दरड कोसळली. मातीचा ढिगारा पडल्यामुळे रेल्वे मार्गच दिसेनासा झाला आहे. तर अनेक ठिकाणी रेल्वे रुळाखालील माती वाहून गेली. त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुढच्या दोन दिवसामध्ये तरी वाहतूक सुरु होणार नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

अटलबिहारी वाजपेयींची आज उणीव भासत आहेः मेहबूबा मुफ्ती

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pune mumbai railway transport stop due to boulder fell near monkey hill and thakurwadi railway station