पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूरात ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण; ऊसाचा ट्रॅक्टर पेटवला

ऊसाचा टॅक्टर पेटवला

कोल्हापूरातील शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर पेटवला. तर आठ ट्रॅक्टरमधील हवा सोडून देत काही ट्रॅक्टरची तोडफोड करत वाहतूक रोखली. 

भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही: सुभाष देशमुख

कर्नाटककडे जाणारे ऊसाचे ट्रॅक्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवले. कोल्हापूर जिल्ह्यातील आळते इथे संतप्त कार्यकर्त्यांनी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पेटवला. दनोळी इथे तीन ट्रॅक्टर अडवून फोडले. तर आठ ट्रॅक्टरमधील हवा सोडून दिली. जोपर्यंत ऊसाचा एफआरपी दर ठरत नाही तोपर्यंत कारखाने सुरु करायचे नाही अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. 

सत्ता संघर्ष मिटणार, पण आघाडी-सेनेचा फॉर्म्युला गुलदस्त्यातच

कोल्हापूरातील साखर कारखाने बंद आहेत. मात्र कर्नाटकातील साखर कारखाने सुरु झाले आहेत. या साखर कारखान्यांमध्ये ऊस घेऊन जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यालाच विरोध करत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत ट्रॅक्टर पेटवून देत वाहतूक रोखली. दरम्यान, येत्या शनिवारी जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद आहे. त्यामुळे ऊसाचा एफआरपी दर ठवरण्यात येणार आहे.

राज्याला लवकरच पर्यायी सरकार देऊ, पण...