पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA: परभणीमध्ये पोलिसांवर दगडफेक, अग्निशमन दलाची गाडी फोडली

परभणीत अग्निशमन दलाची गाडी फोडली

परभणीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनसीआरविरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसंच, अग्निशमन दलाच्या गाडीसह काही गाड्यांची तोडफोड केली आहे. या आंदोलनामुळे परभणीमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  

CAA: यूपीमध्ये आंदोलन चिघळले, गोळीबारात एकाचा मृत्यू ७ जखमी

नागरिकत्व कायद्याविरोधात परभणीमध्ये शुक्रवारी सर्वपक्षीय बंद आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच बाजारपेठ पूर्णतः बंद होती. दुपारी दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्यासंख्येने नागरिक सहभागी झाले होते. मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. 

बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाहीः नितीश कुमार

या मोर्चादरम्यान अचानक काही जण इकडे तिकडे पळू लागले. त्याचवेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी काही आंदोलनकांनी अग्निशमन दलाची गाडी फोडली. तर काहींनी रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या गाड्या आणि घरांवर दगडफेक केली. दगडफेकीमध्ये काही जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. 

दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरले