पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पृथ्वीराज चव्हाण यांनी माझी काळजी करु नयेः राधाकृष्ण विखे

पृथ्वीराज चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील

काँग्रेसमधून भाजपत आलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हा यांच्यावर निशाणा साधला आहे. राधाकृष्ण विखे आणि राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर हे मंत्री होऊ शकत नाहीत. त्यांना मिळालेले मंत्रीपद पक्षांतर व्याख्येचे उल्लंघन असल्याचे चव्हाण यांनी म्हटले होते. यावर विखे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी माझी काळजी करु नये, असे म्हटले आहे. 

अखेर विस्तार झाला, आयात नेत्यांना सर्वांत प्रथम मंत्रिपदाची शपथ

पृथ्वीराज चव्हाण यांच्याच काळात काँग्रेसची वाताहत झाली. काँग्रेस ८२ जागांवरुन ४२ वर आली. त्याचा त्यांनी विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला.

विधानसभेत खडसे आक्रमक, आदिवासी मंत्र्यांना झापले

चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर टीका केली होती. भाजपने आमचे नेते पळवून सरळ सरळ भ्रष्टाचार केला असल्याची टीका केली होती. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना २००३ साली त्यांनी केलेल्या घटनादुरुस्तीनुसार एखाद्या आमदार किंवा खासदाराने आपल्या पक्षाचा राजीनामा देऊन पक्षांतर केले. तर मंत्री होण्यासाठी त्याला पुन्हा निवडणूक लढवून आमदार किंवा खासदार होणे बंधनकारक असणार आहे. या निकषांनुसार विखे आणि क्षीरसागर यांच्याबाबतची सद्य स्थिती घटनाविरोधी असल्याचे, चव्हाण यांनी सांगितले. 

अखेर विस्तार झाला, आयात नेत्यांना सर्वांत प्रथम मंत्रिपदाची शपथ

चव्हाण यांच्या भूमिकेवर विखे यांनी टीका केली आणि आपली काळजी करु नका असा सल्लाही त्यांनी दिला.