पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्राथमिक शिक्षण केवळ मातृभाषेतच हवेः उपराष्ट्रपती नायडू

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि कॅबिनेट मंत्री नितीन राऊत

भाषेला जाती किंवा धर्माच्या दृष्टिकोनातून न बघता संस्कृत भाषेचा प्रचार हा साध्या, सोप्या भाषेत करुन त्याची शब्दावली आजच्या आवश्यकतेनुसार समृद्ध करणे आवश्यक आहे. वैयक्तिक जीवनात स्थानिक भाषा ही अत्यंत महत्त्वाची असून, प्राथमिक शिक्षण हे केवळ मातृभाषेतच व्हायला हवे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.

कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापिठातर्फे सुरेश भट सभागृहात त्रिदिवसीय अखिल भारतीय प्राच्यविद्या संमेलनाचे उद्घाटन उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  

...म्हणून CM ठाकरेंच्या शब्दानंतरही उपोषण करावं लागलं : छ. संभाजीराजे

संस्कृत ही सर्व भाषांची जननी असून, अनेक भाषांची उत्पत्ती संस्कृत भाषेपासून झाली आहे. इतिहासाचे अध्ययन करण्यासाठी प्राच्यविद्येचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगताना उपराष्ट्रपती म्हणाले की, वैयक्तिक जीवनात तसेच प्रशासनिक कार्यामध्ये स्थानिक भाषा महत्त्वाची आहे. मातृभाषेतून भाव-भावना, संकल्पना, व्याख्या आदी सहज स्पष्ट होतात. त्यामुळे राज्यात मराठी भाषेतूनच प्राथमिक शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. तसेच राज्यांनीही केवळ मातृभाषेतूनच शिक्षण द्यावे, असे आवाहनही उपराष्ट्रपती नायडू यांनी केले.

नागपूर हे प्राच्यविद्येचे प्रतिष्ठित केंद्र असून जगात संस्कृत भाषेला आदराचे स्थान असून, जागतिक स्तरावर या भाषेच्या अध्ययनाचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेची तुलना अमृतासोबत केली आहे.  देशात दोनशे भाषा लुप्त होत असून, एक भाषा ही एक संस्कृती आहे. आपली भाषा, संस्कृती व इतिहासाची माहिती युवा पिढीला शिकविणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.  

शाळांमध्ये CAAचा प्रचार करणे मुर्खपणा, आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

पाली, पारसी, अरबी भाषांचे अध्ययनही अनेक भाषांमधून करण्यात आले आहे. या भाषा, अध्ययनाचे दस्तावेज उपलब्ध आहेत. यावेळी  संस्कृतसह प्राच्यविद्या अध्ययन व संशोधनाच्या विविध संस्थांचा, पुण्यातील भांडारकर प्रतिष्ठान यासह इतरही भाषासंस्थाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. भाषा आणि भावना सोबत असल्यास त्या सहज व्यक्त करता येतात. तसेच त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडेही सहज वहन करता येतात. भारत हा बहुविध भाषा असलेला मोठा देश असून, येथे १२१ भाषांमध्ये स्थानिकांकडून संवाद साधला जातो, असे त्यांनी सांगितले.

उपराष्ट्रपती नायडू यांनी मुलांना गौरवशाली असलेल्या भारताचा इतिहास शिकविण्याचे आवाहन करताना त्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर ते झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, संत बसवेश्वर, नारायण गुरु, शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा इतिहास शिकविण्याचे आवाहन केले. कस्तुरीनंदन समितीने शिक्षणाबद्दल अनेक सूचना केल्या असून, त्याचे पालन होणे आवश्यक आहे. त्यांच्या सूचनांनुसार कला, क्रीडा, संस्कृती, पर्यावरण, कृषी, निसर्ग आदी विषयाच्या शिक्षणाला प्राधान्य देतानाच भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा अभिमान सर्वांनीच बाळगण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय विकसित तंत्रज्ञानाबद्दल जगात सर्वात जास्त मागणी असून, ज्ञान ही आजची सर्वात मोठी संपत्ती आहे. भारतीय जीवन पद्धतीला ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड आहे. 

नायर रुग्णालयात पुन्हा डॉक्टरांना मारहाण; ओपीडी बंद

संस्कृतचे भारतापेक्षाही जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणावर अध्ययन होत असल्याचे त्यांनी लक्ष वेधले. विद्यापिठाद्वारे संस्कृत भाषेची जनजागृती, प्रसाराचे चांगले काम होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्राच्यविद्या जगाच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र होत असून, ते नागपुरात होत असल्याची आनंददायी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासोबतच संशोधनाला कवि कुलगुरु संस्कृत विद्यापिठाच्या माध्यमातून प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगताना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासनातर्फे संपूर्ण सहकार्य आहे.  संस्कृत भाषेचे राज्यातील एकमेव विद्यापीठ असून, संपूर्ण भारतात संस्कृत भाषेला सामान्य अभ्यासकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य विद्यापिठामार्फत सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या असून, परिषदेतील निर्णयासंदर्भात राज्यशासनातर्फे आवश्यक  सहकार्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

फिंच म्हणाला, विराटच्या वाघांना रोखणं 'मुश्किल', पण ...