पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ACP राम जाधव यांच्यासह ४६ पोलिसांना 'राष्ट्रपती पोलीस पदक'

एन्काऊंटर स्पेशालिस्ट राम जाधव यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्र पोलीस दलातील ४६ कर्तव्यदक्ष पोलीसांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनी दिल्या जाणाऱ्या  'राष्ट्रपती पोलीस पदक' देण्यात येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावाची बुधवारी घोषणा करण्यात आली. यात ५ जणांना विशेष सेवेसाठी, तर ४१ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी गौरवण्यात येईल. 

 

लाल किल्ल्यावरुन मोदी पाकवर शाब्दिक तोफ डागणार?

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापुरच्या करवीर विभागातील पोलीस उप-अधीक्षक राजाराम पाटील, मुंबईतील साकिनाका विभागातील सहायक पोलीस आयुक्त मिलिंद खेटले, पुण्यातील एसआरपीएफचे असिस्टंड कमांडंट हरिश्चंद्र काळे आणि कोल्हापूर जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक मारुती कलप्पा सूर्यवंशी यांना (विशेष सेवा) राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.

Independence Day: मुंबईसह देशभरात कडेकोट बंदोबस्त

रामचंद्र जाधव यांना तिसऱ्यांदा हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी त्यांना २००१ आणि २००९ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्याशिवाय राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे.