पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमदार फोडण्यासाठी सत्तेचा गैरवापर सुरु : शरद पवार

शरद पवार

भाजप-सेनेकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे, असा अरोप करत राष्ट्रवादीतील गळतीची चिंता नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले. ६ आमदार असल्यापासून ६० आमदार केले असे सांगत त्यांनी पक्ष पुन्हा जोमाने उभा करु, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी शरद पवारांना काही प्रश्न विचारले होते. यावर उत्तर देताना शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.     

नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी झालेल्या मुलाखतींना राज्यातील काही नेते अनुपस्थितीत होते. यावरही त्यांना प्रश्न विचारण्यात आले. यावर शरद पवार म्हणाले की, ज्यांना उमेदवारी मिळणार आहे, त्यांनी या मुलाखतीसाठी हजर राहण्याची काहीच आवश्यकता नव्हती.  

भाजप-सेना सत्तेचा गैरवापर करुन फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप करताना त्यांनी राज्यात सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचे म्हटले आहे. काही नेत्यांची कार्यालये आणि घरांवर होणाऱ्या प्राप्तीकर विभागाच्या छापेमारीचा दाखलाही त्यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच काल्हापूरमधील मुश्रीफांचे घर आणि कारखाना परिसरात प्राप्तीकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. काही लोक सत्ता आणि स्वार्थासाठी पक्ष सोडत आहेत. या पडझडीतून पक्ष पुन्हा सावरेल, असेही शरद पवार म्हणाले.