पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रकाश आंबेडकर हेच भिडे-एकबोटेंना वाचवत आहेत, जयंत पाटलांचा आरोप

जयंत पाटील आणि प्रकाश आंबेडकर

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणात प्रकाश आंबेडकर हेच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना वाचवत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर

ते म्हणाले, आंबेडकर यांचे आरोप हास्यास्पद आहेत. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे जर गुन्हेगार आहेत असे त्यांना वाटते. तर त्यांनी त्यांच्या साक्षीत का उल्लेख केला नाही, असा सवाल त्यांनी विचारला. 

त्यांनी साक्षीत भिडे-एकबोटे यांचा उल्लेखच केला नाही. तेच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. उलट शरद पवार यांनी विशेष चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

सत्य बाहेर येण्याचा भितीने NIAकडे तपास - शरद पवार

दरम्यान, एल्गार परिषद आणि त्यानंतर एक जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव इथे झालेला हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सत्य बाहेर येण्याचा भितीने एनआयएकडे तपास सोपवण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच, अन्यायाविरोधात बोलणे म्हणजे नक्षलवाद नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. मुंबईमध्ये शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:prakash ambedkar try to defend sambhaji bhide and milind ekbote says minister jayant patil