पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींच्या राज्यात तरुणाईवर तुरुंगवास भोगण्याची वेळ : प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व मुद्यावरुन मोदी सरकारवरील रोष महिनाभरानंतरही कायम आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यासंदर्भात वचिंत बहुजन विकास आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीला ३५ हून अधिक संघटनांचे प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती. या बैठकीत २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद ठेवण्याची तारीख निश्चित करण्यात आली.  

...तर जीभ जागेवर राहणार नाही; नारायण राणेंचा इशारा

वंचित बहुजन अघाडीच्यावतीने बोलवण्यात आलेल्या या बैठकीत सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व कायदा या मुद्यावरुन सरकारला विरोध करण्याबाबत चर्चा आणि नियोजन करण्यात आले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपसह आरएसएसवर निशाणा साधला.  केंद्र सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आंबेडकर म्हणाले, आरएसएस (राष्ट्रीय स्वंयसेवक संघ) सुधारित नागरिकत्व कायदा  (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) च्या माध्यमातून देशात एक नवी प्रणाली निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आरएसएस कधीच समानतेविषयी भाष्य करत नाही. ती विचारधारेवर काम करणारी संघटना आहे. त्यामुळे सध्याची लढाईही विचारधारेवरोधातील आहे. 

शिवसैनिकांच्या मनात इदिराजींबद्दल आदराची भावना: आदित्य ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मोदींनी आपले आयुष्य स्वांतत्र्यात जगले. जेव्हा देशातील तरुणांनी स्वातंत्र्यात जगायची वेळ आली त्यावेळी मोदी त्यांना गजाआड टाकत आहेत. मागील ७० वर्षांत जे झाले नाही ते मोदी सरकारच्या काळात पाहायला मिळत आहे. पंतप्रधान देशातील तरुणांच्या भविष्याशी खेळत असून ते याविषयावर कधीही बोलत नाहीत, असा घणाघात करत त्यांनी मोदींवर टीकास्त्र डागले. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मागील अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारने जनतेला अनेक आश्वासने दिलीय त्याची पूर्तता करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. उद्या नव्या अर्थसंकल्पातून पुन्हा ते जनतेची दिशाभूल करतील, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला.