राज्य सरकारने भीमा-कोरेगाव प्रकरणातील नेमके कोणते गुन्हे मागे घेतले, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितीत केला आहे. राज्य सरकारने गुरुवारी भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घेतल्याची घोषणा केली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणातील ३४८ गुन्हे मागे घेतल्याची सांगितले. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
भीमा-कोरेगाव: ३४८ गुन्हे मागे, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना माफी नाही!
प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी म्हटलंय की, महाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणाच्या काही गुन्हे मागे घेतल्याची घोषणा केली. याप्रकरणात दोन प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. १ जानेवारीला ज्या अलुतेदार-बलुतेदार, बौद्ध समूहांवर हल्ला करण्यात आला त्या संदर्भात वेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे. तर या हल्ल्याच्या निषेधार्थ २ आणि ३ जानेवारीला जो निषेध करण्यात आला त्यासंदर्भातही काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने नेमके कोणते गुन्हे मागे घेतले याचे स्पष्टीकर द्यावे.
आता जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले, प्रवासादरम्यान जातीचा
महाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणाच्या काही केसेस मागे घेण्याची घोषणा केलीय.भीमा कोरेगाव प्रकरणात दोन प्रकारच्या केसेस आहेत. पहिली केस 1 जानेवारीला ज्या अलुतेदार-बलुतेदार, बौद्ध समूहांवर हल्ला करण्यात आला त्या संदर्भातील आहे, तर दुसरी केस या हल्ल्याच्या निषेधार्थ pic.twitter.com/s5j7thCdyh
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 27, 2020
पुण्यातील भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी, २०१८ मध्ये शौर्य दिनानिमित्त आलेल्या आंबेडकर अनुयायांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेचे पडसादनंतर राज्यभरात उमटल्याचे पाहायला मिळाले होते. त्या घटनेच्या निषेधार्थ २ आणि ३ जानेवारी २०१८ रोजी राज्यव्यापी बंद पुकरण्यात आला होता. बंदकाळात मोठा हिंसाचार झाला होता. या घटनेनंतर ६०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले होते.