पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'प्रहार जनशक्ती'च्या माजी जिल्हाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या

तुषार पुंडकर

प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अकोट शहरातील पोलिस कार्टरजवळ ही घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री तुषार पुंडकर यांच्यावर काही अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या तुषार पुंडकर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे अकोट शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अकोट पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

महाराजांचा जय जयकार करायला कमीपणा वाटतो का?: मनसे

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहरातील पोलिस कार्टरजवळ गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये पुंडकर गंभीर जखमी झाले. त्यांच्या पाठीला दोन गोळ्या लागल्या होत्या. जखमी अवस्थेत त्यांना अकोला शहरातील आयकॉन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 

अक्षय्य तृतीयेला सुरु होऊ शकते राम मंदिराचे बांधकाम

आरोपींनी देशी कट्ट्याच्या सहाय्याने तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार केला होता. पोलिसांनी याप्रकरणी अकोट पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करत शोध सुरु केला होता. अवघ्या काही तासांत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.  या घटनेची माहिती मिळताच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्याकडे धाव घेतली. तुषार पुंडकर हे बच्चू कडूंचे कट्टर समर्थक होते. तसंच ते प्रहार जनशक्ती पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते होते. या घटनेमुळे अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

लासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडितेचा मृत्यू