पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रभू श्रीराम हे मुसलमानांचेही पूर्वजः रामदेव बाबा

रामदेव बाबा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ANI)

प्रभू श्रीराम हे फक्त हिंदू आणि मुसलमानांचे नव्हे तर राष्ट्राचे पूर्वज आहेत, असे वक्तव्य योगगुरु रामदेव बाबा यांनी केले आहे. आस्था सर्वांत मोठी गोष्ट आहे. त्याचा कधी घात नाही केला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा वाद सहमतीने सोडवण्यासाठी मध्यस्थांची नियुक्ती केली आहे. पण त्यांच्याकडून काही तोडगा निघताना दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच राम मंदिर होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी नांदेड य़ेथे आले असताना ते माध्यमांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, हिंदू आणि मुसलमानांचा डीएनए एक आहे. मुसलमान हे आमचे भाऊ आहेत. आमचे पूर्वज एक होते. राम केवळ हिंदूंचे पूर्वज नाहीत, ते मुसलमानांचेही पूर्वज आहेत. पूर्वजांचा अनादर केला जाऊ नये. हिंदू आणि मुसलमानांनीही आपल्या पूर्वजांचा गौरव वाढवला पाहिजे.

रामदेव बाबांच्या पतंजलीच्या विक्रीमध्ये मोठी घट

राम मंदिर उभारण्याच्या दोन पद्धती आहेत. एक तर सर्वोच्च न्यायालयाने यावर त्वरीत निर्णय घ्यावा. न्यायालयाने मध्यस्थांची नेमणूक केली आहे. पण त्यांच्याकडून काही तोडगा निघेल असे वाटत नाही. दुसरा पर्याय हा की, जनतेने स्वतःच मंदिराची उभारणी करावी. पण नंतर लोक त्यावर प्रश्न उपस्थित करतील.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातच राम मंदिराची उभारणी होईल याचा मला विश्वास आहे. राम मंदिर उभा राहिल आणि राम मंदिरासाऱखे चरित्रही होईल, असेही ते म्हणाले. 

तिसऱ्या अपत्याला मतदानाचा अधिकार देऊ नका - रामदेव बाबा