पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अखेर ठाकरे सरकारचे खातेवाटप जाहीर, पाहा कोणाकडे कोणती जबाबदारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर अधिवेशनाच्या तोंडावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वा खालील महाविकास आघाडी सरकारने गुरुवारी खातेवाटप जाहीर केले. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह आणि नगर विकास खात्याची जबाबदारी देण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जंयत पाटील यांच्याकडे अर्थ आणि गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रपदाची शपथ घेतली त्यावेळी एकनाथ शिंदे, सुभाष देसाई छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि  नितीन राऊत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र त्यांच्याकडे कोणती जबाबदारी असणार हे स्पष्ट झाले नव्हते. खातेवाटपाच्या मुद्यावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकास आघाडीवर टीका केली होती. नागपूर अधिवेशनात आम्ही प्रश्न कुणाला विचारायचे असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला होता   

एकनाथ शिंदे- गृह नगरविकास, वन, पर्यावरण, पाणी पुरवठा जलसंधारण सार्वजनिक बांधकाम 
सुभाष देसाई - उद्योग, उच्च तंत्रशिक्षण, कृषी, रोजगार हमी योजना, परिवहन
जयंत पाटील - वित्त, गृह निर्माण सार्वजनिक आरोग्य, सहकार, अन्न नगर पुरावाठा आणि कामगार
छगन भुजबळ- ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय, उत्पादनात शुल्क, अन्न औषध प्रशासन
बाळसाहेब थोरात- महसूल, ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण आणि पदुम
नितीन राऊत- सार्वजनिक बांधकाम (उपक्रम वगळून) आदिवासी महिला बालविकास, मदत व पुनर्वसन