पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बसने दुचाकीला उडवले, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

अपघातामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

उमरगा शहरातील श्री गणेश चित्र मंदिराजवळील राष्ट्रीय महामार्गावर बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होवून अपघात झाला आहे. यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी दिडच्या सुमारास घडली. उमरगा तालुक्यातील कसगी येथील रहिवासी असलेले मोहन गोविंदराव मोरे (५०) हे उस्मानाबाद मुख्यालयाच्या पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते उमरगा येथे बंदोबस्तासाठी आले होते.

उस्मानाबाद : विहिरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

पत्नी सुनीता मोहन माने महात्मा गांधी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याने ते शहरात वास्तव्यास होते. दुपारी दिड वाजता बंदोबस्तासाठी मोहन गोविंदराव मोरे दुचाकीवरून (क्रमांक एमएच २५ ए.ई.८८२६) उमरग्याकडे येत असताना गणेश चित्र मंदिराजवळील राष्ट्रीय महामार्गावर जालनाच्या दिशेने जाणाऱ्या कलबुर्गी-जालना या बसने (क्रमांक एम एच २० बी एल ४०८३) त्यांच्या  दुचाकीला समोरासमोर धडक दिली.  घटनेनंतर नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरानी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.