पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परळीतील मोदींच्या सभेवरुन येताना पोलिसांच्या गाडीला अपघात

बीडमध्ये पोलिसांच्या गाडीला अपघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परळीतील सभेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे.  बीड पोलिस दलातील दंगल प्रतिबंधक पथकाच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात १० ते १५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे हा अपघात झाला आहे. जखमी पोलिसांना माजलगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

पुणे देशाला संस्कारही देते आणि स्टार्टअपही : PM मोदी

परळी येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. या सभेसाठी बीड येथील दंगल प्रतिबंधक दल आले होते. मोदींची सभा संपल्यानंतर बीडकडे परतत असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. सिरसाला-दिंडरुड दरम्यान सिरसाळा येथे पोलिसांनी गाडी रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातामध्ये १० ते १५ पोलिस जखमी झाले आहे. यामधील चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे अपघातग्रस्त पोलिसांच्या मदतीला धावून आले.

पी. चिदंबरम यांच्या कोठडीत २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ