पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कविताच्या माध्यमातून कोरोनाविषयी पोलिसाने केली जनजागृती

मोहोळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक अभिजित गाटे

राज्यात शिरकाव केलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि कशी काळजी घ्यावी याबाबत कवितेच्या माध्यमातून एका पोलिसाने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. मोहोळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक अभिजित गाटे यांनी कोरोनाबाबत "माणूस आहात माणसासारखं रहाना कारण आलाय आता कोरोना..." ही कविता तयार केली आहे. त्यांनी या कवितेच्या माध्यमातून जनतेचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या कवितेला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

उपाययोजनांची गती वाढवली पाहिजे, उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी

अभिजीत गाटे यांनी कोरोनासंदर्भात तयार केलेल्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी माणसाने माणसासारखे वागा, आपापसातील वाद, विवाद, अहंकार, रुसवे, फुगवे सोडून मोठ्या मनाने एकमेकांना माफ करा असा संदेश दिला आहे. तसंच कोरोना आला आहे त्यामुळे शहरी भागात कामाला गेला असला तरी आई-वडिलांना विसरु नका, सगळी मंदिरे बंद झाली तरी दवाखाना, पोलिस ठाणे ही दोन मंदिरे सुरु आहेत. त्यातील सेवक, डॉक्टर, पोलिस अधिकारी, कर्मचारी, नेहमी तुमच्या सेवेसाठीच अहोरात्र झटत आहेत जरा त्यांचाही विचार करा, अशा सूचना कवितेच्या माध्यमातून त्यांनी दिल्या आहेत.

३१ मार्च नाही तर पुढील आदेश मिळेपर्यंत सूचनांचे पालन करा : अजित पवार

अभिजीत गाटे यांनी कोरोनासंदर्भात दक्ष राहून इतर बाबतीत नागरिकांची कान उघडणी केली आहे. गाटे यांना कविता करण्याचा छंद आहे. ते आपली सेवा बजावत नेहमी सामाजिक आणि वास्तववादी परिस्थितीवर कविता तयार करत सामाजिक प्रबोधन करत असतात. पोलिस नाईक असूनही दंडूक्यापेक्षा ते शब्दांच्या माऱ्यांनी लोकांमध्ये जनजागृती करण्यावर त्यांचा जास्त भर असतो. गाटे यांच्या या कवितेचा स्वतः आवाजातील व्हिडिओ 'महाराष्ट्र पोलिस - वर्दीतला माणूस' या पेजवर टाकण्यात आला आहे. हा व्हिडिओ सर्वांच्या पसंतीस उतरत असून अनेकांनी गाटे यांचे कौतुक केले आहे. 

अभिजित गाटे यांनी तयार केलेली कविता 

मित्रांनो जीवन क्षणभंगुर आहे हे जरा जाणून घ्या ना, माणसाला माणूस बनविण्यासाठी आलाय आता कोरोना..,

आजवर स्वार्थासाठी धावलो, इस्टेटसाठी भांडलो, पुरे झाले हे आता ना माणूस आहात माणसासारखं वागाना आलाय आता कोरोना,

शेतातील भांडण शेतातच सोडा ना किती जरी कमवलं तरी सारे इथेच ठेवायचे ना, बांध टोकरायचं आता थांबवा ना, आलाय आता कोरोना..,

तुझं माझं, तू मोठा की मी मोठा, हे अहंकार, अहंभाव आता सोडा ना, साध राहून जीवनाचा आनंद लुटाना, माणूस आहात माणसासारख रहाना कारण आलाय आता कोरोना..,

आपापसातील भांडण तंटे, रुसवे-फुगवे आता सोडा ना, मोठ्या मनाने एकमेकांना माफ करून पोलीस स्टेशन टाळा ना, कारण आलाय आता कोरोना..

आई-बाबांना सोडून तुम्ही शहराला गेलता ना,  त्यांना कधी तिकडे बोलवलं का, आज त्यांच्याचकडे तुम्हाला यावं लागलं ना, कोरोनाचा क्षणभर ही विचार न करता त्यांनीच तुम्हाला घरात घेतल ना आई-बाबांना विसरु नका हेच शिकवतोय तुम्हाला कोरोना..,

कोरोना असो वा दंगा, पोलिसांनाच दक्ष राहवे लागते ना, सारी मंदिरे बंद झाली तरी पोलिस स्टेशन नावाचे मंदिर उघडे दिसते ना, जरा आमचाही विचार करा ना भांडण तंटा सोडा ना आलाय आता कोरोना...