पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संतापजनक: संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत टाकले विष

विहरीत टाकले विष

बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐन दुष्काळात अख्ख्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये विष टाकल्याची घटना घडली आहे. गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील ही घटना आहे. या घटनेमुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, ज्या व्यक्तीने हे कृत्य केले आहे त्याच्याविरोधात कारवाई करुन त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 

बाबरी मशीद प्रकरणी ९ महिन्यांत निकाल द्या-सर्वोच्च न्यायालय

बीडमध्ये भीषण दुष्काळ परिस्थिती आहे. विहिरी, बोअरवेल आटले आहे. त्यामुळे इथल्या ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशामध्ये भोजगाव येथील रावसाहेब शिंदे यांच्या शेतातील विहिरीला दुष्काळातही पाणी असल्यामुळे या विहिरीतून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जातो. ही विहीर शासनाने अधिग्रहण केली होती. याच विहिरीतून टँकरद्वारे गावातील वाड्या, वस्त्यांना पाणी पुरवठा केला जातो. 

सोनभद्र गोळीबार प्रकरण: प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

मात्र, काल रात्री या विहिरीमध्ये कोणी तरी कापसाला फवारले जाणारे किटकनाशक ओतले. भोजगावातील काही गावकरी सकाळी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा वास आला. त्यांनी याबाबत रावसाहेब शिंदे यांना माहिती दिली. त्यांनी ताबडतोब पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञाताविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा आधीच्या सरकारांमुळेच शक्य 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीतील पाण्याचे नमुने ताब्यात घेतले. या विहिरीमध्ये तब्बल ३ किटकनाशकाच्या बाटल्या ओतण्यात आल्या होत्या.  या घटनेमुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे. अशामध्ये पाणी आणायचे कुठून हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 

स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी मोदींनी मागवली जनतेची मतं