पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँकेत सव्वा दोन कोटी अडकले; हार्ट अटॅकने महिलेचा मृत्यू

पीएमसी बँक

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. पीएमसी बँकेत अडकलेल्या पैशांमुळे चिंतेत येऊन भारती सदरांगानी (७३ वर्ष) या महिलेचा मृत्यू झाला आहे. भारती सदरांगानी या सोलापूर येथे राहणाऱ्या आहेत. रविवारी दुपारी २ वाजता भारती यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.

पीएमसी बँकेच्या खातेधारकांचे आझाद मैदानावर आंदोलन

भारतीय यांच्या कुटुंबियांनी मंळवारी असा दावा केला आहे की, 'पीएमसी बँकेत अडकलेल्या पैशांमुळे त्या चिंतेत होत्या. त्यांच्या मुलीचे पीएमसी बँकेत खाते होते. त्यांचे तब्बत २  कोटी २५ लाख रुपये बँकेत अडकले होते. त्यामुळे त्या प्रचंड तणावाखाली होत्या.' मुलुंड येथील पीएमसी बँकेत त्यांच्या मुलीचे खाते आहे. 

राज्यसभेत NDAची स्थिती आणखी मजबूत, काँग्रेसचे नेते भाजपत

भारती यांचे जावई चंदन चोटरानी यांनी सांगितले की, 'भारती यांच्या आरोग्याबाबत काहीच तक्रारी नव्हत्या. त्यांची तब्येत देखील चांगली होती. त्यांच्या निधनामुळे माझ्या पत्नीला धक्का बसला आहे. चंदन चोटरानी हे व्यावसायिक आहेत. दरम्यान, पीएमसी बँकवर आरबीआयने निर्बंध लादल्यामुळे बँकेच्या खातेधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आयुष्यभराची कमाई बँकेत अडकल्यामुळे चिंतेत येऊन अनेक खातेधारकांचा बळी गेला आहे. 

नोबेले विजेते अभिजित बॅनर्जींना भेटल्यावर नरेंद्र मोदी म्हणतात...