पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देत कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आक्रमक, धडाडीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राने विकासाचा उच्चांक गाठला आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गोर गरिबांच्या विकासासाठी चांगली काम केली आहेत. त्यांना वाढदिवसांच्या खूप खूप शुभेच्छा. तसंच त्यांना चांगले आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो' असे ट्विट करुन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसानिमित्त आज वर्षा बंगल्यावर वृक्षारोपण केले. दरम्यान, पंतप्रधानांसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचा उत्साह आणि सेवा देण्यासाठी त्यांची वचनबद्धता पाहून राज्याने विकासाचा एक नवीन युग पाहिला आहे. त्याच भावनेने आणि समर्पणाने ते महाराष्ट्रातील जनेताला सेवा देत राहतील. त्यांच्या निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो.' असे अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.