पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PM मोदींच्या हेलिकॉप्टरचे फोटो काढले, एटीएसकडून दोघांची चौकशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) नागपूर विमानतळ परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरचे छायाचित्र काढल्याप्रकरणी दोन जणांची चौकशी केली. मुंबईतील एका व्यक्तीच्या मोबाइलवर पंतप्रधान मोदींचे एक छायाचित्र आढळून आल्याचे एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

भारतीय लष्कराची पीओकेत कारवाई, दहशतवादी तळ केले उद्ध्वस्त

पंतप्रधान मोदी हे मागील रविवारी नागपूर विमानतळावरील एका हेलिपॅडवरुन भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरात गेले होते. तिथे त्यांना एका प्रचारसभेत भाषण करायचे होते. एका वरिष्ठ पोलिस या घटनेला दुजोरा दिला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

निवडणूक भरारी पथकाने कारमधून ४ कोटी केले जप्त

दरम्यान २१ ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. शनिवारी दोन्ही राज्यातील प्रचार थांबला. दोन्ही राज्यांत भाजपचे सरकार आहे. सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपचे तमाम दिग्गज प्रचारात उतरले होते. या रॅलीत मोदींनी स्वतः हरियाणा आणि महाराष्ट्रात अनेक प्रचारसभा घेतल्या.

येत्या ४८ तासात राज्यात मेघगर्जनांसह जोरदार पावसाची शक्यता