पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बंदी असताना रथोत्सवाचा प्रयत्न, जमावाकडून पोलिसांवरच दगडफेक

वागदरी (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथे परमेश्वर यात्रेच्या शेवटच्या दिवशी रविवारी काही हुल्लडबाजांन

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन असतानाही वागदरी (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथे परमेश्वर यात्रेच्या शेवटच्या दिवशी रविवारी काही हुल्लडबाजांनी रथोत्सव करण्याचा प्रयत्न केला. गर्दीला पांगवणाऱ्या पोलिसांवरच जमावाने दगडफेक केली. यात एक पोलिस निरीक्षक, तीन कर्मचारी व होमगार्ड असे चौघे जखमी झाले. या प्रकारानंतर पोलिसांना लाठीमार करावा लागला. हा प्रकार रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. 

मुंबईतील चाळीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

देशासह राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. सर्व यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. या यात्रेत केवळ दोघांनी पूजा करावी, अशी सूचना प्रशासनाने दिली होती. यात्रा पंच कमिटीनेही त्याला होकार दिला होता. तरीही ऐनवेळेस काहींनी गर्दी करत रथोत्सव करण्याचा प्रयत्न केला. 

'डॉक्टरांचे प्रेस्क्रिप्शन असलेल्यांना मद्य द्या'

पोलिसांनी गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या मंडळींनी पोलिसांवरच दगडफेक केली. यात पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी यांच्यासह तीन कर्मचारी आणि एक होमगार्ड असे चौघे जखमी झाले. गावात तणावपूर्ण शांतता आहे. 

ही दुर्दैवी घटना आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढणार का ? कॅबिनेट सचिव म्हणाले...

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pilgrims stone pelting on police at vagdari akkalkot solapur during lockdown for coronavirus covid 19