पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उंचावरुन फोटो काढताना पडल्याने छायाचित्रकाराचा मृत्यू

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

उंचावरून फोटो काढताना पडल्याने एका छायाचित्रकाराचा मृत्यू झाला. अमरावती येथील एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत ही घटना घडली. गोपाल नगरातील पवन नगर क्रमांक २ मधील रहिवासी उमेश रंगरावजी राऊत (वय ४७) असे मृत छायाचित्रकाराचे नाव आहे. एका उत्कृष्ठ छायाचित्रकाराचा असा अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मनसेचं शॅडो कॅबिनेट सरकारचे वाभाडे काढण्यासाठी: राज ठाकरे

मृत उमेश राऊत यांचा रंगप्रभा नावाचा स्टुडिओ आहे. राऊत यांना जाधव कंपनीचे इंडस्ट्रीयल फोटोग्राफीचे काम मिळाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते छायाचित्र काढत होते. एमआयडीसी मधील जाधव लेलॅंड कंपनीत त्यांनी छायाचित्र काढण्यास सुरूवात केली होती. कंपनीचे उंचावरून छायाचित्र काढत असताना अचानक ते कोसळले. उंचावरून थेट जमिनीवर कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले.

मनसेचं 'शॅडो कॅबिनेट' जाहीर, पाहा यादी

जखमी अवस्थेत त्यांना त्वरीत शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने तेथून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी डॉक्टरांनी उमेश यांना मृत घोषित केले.

आदित्य ठाकरेंच्या 'पर्यटन' विभागावर अमित ठाकरेंची नजर