पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडल्यास पनवेलमध्ये २० मार्चपासून दुकानं बंद

पनवेल

अन्नधान्य, भाजीपाला, केमिस्ट यांसारखी अत्यावश्यक वस्तूंची दुकानं, रुग्णालयं आणि दवाखाने सोडली  तर पनवेलमध्ये २० मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दुकानं पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनामुळे ICSE आणि ISC बोर्डाच्या परीक्षा स्थगित

पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना केली आहे. गर्दी टाळण्यासाठी  पनवेल महानगरपालिका हद्दीतील जीवनावश्यक वस्तू, बेकरी, डेअरी, किराणा मालाची दुकानं ,केमिस्ट, भाजीपाला आणि खाद्याची दुकानं सोडून सर्व दुकानं पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत, असं आयुक्तांनी म्हटलं आहे. 

रंजन गोगोईंनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची घेतली शपथ, विरोधकांचा सभात्याग

जर या आदेशाचे उल्लंघन झाले तर इतर दंडात्मक कारवाई करण्यात येईलं असंही आयुक्तांनी सांगितलं आहे. तर  सार्वजनिक ठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबईत ५० टक्के दुकाने एक दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गर्दीची ठिकाणे आणि गजबजलेल्या परिसरात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दादर, माहीम, धारावी या भागातील केमिस्ट आणि अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने एक दिवसाआड बंद राहाणार आहेत.