पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पुढे काय करायचं, थोडा वेळ द्या'; पंकजा मुंडे १२ तारखेला मोठा निर्णय घेणार?

पंकजा मुंडे

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव मान्य असल्याचे जरी त्यांनी सांगितले आहे. पण तरीही हा पराभव त्यांना जिव्हारी लागल्याचे दिसते. पराभवानंतरही त्या पक्षात सक्रिय झाल्या होत्या. निकालानंतर त्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकांमध्ये सहभागीही झाल्या होत्या. परंतु अचानक त्यांनी रविवारी फेसबुक पोस्ट टाकत खळबळ उडवून दिली आहे. 

मी येथे येईन असं कधीच म्हणालो नाही, तरीही मी आलो; CM ठाकरेंचा टोला

आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे, अशी पोस्ट त्यांनी टाकली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे नवीन निर्णय काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय म्हटलंय पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये.. 

 

नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे...

निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण सर्वजण पहात होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जवाबदारी माझी आहे.

दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले.
'आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:' हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले.

पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. "ताई आम्हाला भेटायला वेळ द्या," .."ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या "...किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली .

'राधाकृष्ण विखे-पाटील आमचेच आहेत, आम्ही त्यांना ओढून आणू'

मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहिल्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जवाबदारी म्हणुन राजकारणात राहीले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.

आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे...
आठ ते दहा दिवसांनंतर...हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.

शेतकऱ्याचा पुत्र अध्यक्ष झाला याचा आनंद: मुख्यमंत्री

१२ डिसेंबर,लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस...त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त...जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय ...तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे?

१२ डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू !!

येणार ना मग तुम्ही सर्व? मावळे येतील हे नक्की !!!!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pankaja munde write facebook post on her next political decision on upcoming 12th december 2019