पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोअर कमिटीच्या बैठकीला पंकजा मुंडेंची अनुपस्थिती, आता लक्ष गोपीनाथगडावरील भाषणाकडे

पंकजा मुंडे

भाजपच्या राज्यस्तरिय कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे मंगळवारी अनुपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोनच दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये झालेल्या विभागस्तरिय बैठकीलाही पंकजा मुंडे अनुपस्थित राहिल्या होत्या. तब्येत ठीक नसल्याने आणि गुरुवारी गोपीनाथ गडावरील कार्यक्रमाच्या तयारीसाठी वेळ हवा असल्याने पंकजा मुंडे कोअर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याची माहिती मिळाली आहे. 

'मनोहर जोशींनी केलेले विधान ही त्यांची वैयक्तिक भूमिका'

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण खुद्द पंकजा मुंडे यांनी आपण पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आता गोपीनाथ गडावरील भाषणामध्ये त्या नक्की कोणता मुद्दा मांडणार याकडे लक्ष लागले आहे. भाजपतील ओबीसी नेते गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या भेटीगाठी घेऊ लागले आहेत. पक्षात ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची त्यांची भावना आहे. 

शिवसेनेकडे गृह, नगरविकास; राष्ट्रवादीकडे अर्थ, गृहनिर्माण, घोषणा लवकरच

पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सोमवारी दिल्लीत जाऊन पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांची भेट घेतली होती. त्यांना आपण राज्यातील स्थिती सांगितल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. त्याच दिवशी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. मंगळवारी मुंबईत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. राज्यातील पक्षाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी उघडपणे नाराजीही व्यक्त केली होती.